अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात एक गाव असेही ! बस गेल्या तीन वर्षांपासून फिरकलीच नाही…

Ahmednagar News : कोरोनामुळे सर्वांचेच नियोजन विस्कळीत झाले होते. आता परिस्थिती पूर्व पदावर येऊन एक वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र, त्यातही राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्परतेचा विसर तर पडला नाही ना असा प्रश्न शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पडला आहे.

शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथून शालेय विद्यार्थी तसेच इतर प्रवासी तसेच शेतकरी बाहेरगावी जातात. परंतु त्यांना सकाळी सहा वाजता शेवगाव येथे जाण्यासाठी उपलब्ध असायची, सायंकाळी पाच वाजता शेवगाव येथून शालेय विद्यार्थी घेऊन मुक्कामी मठाचीवाडी येथे येणारी बस गेल्या तीन वर्षांपासून फिरकलीच नाही.

शालेय विद्यार्थीना, प्रवाशांना व शेतकऱ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असून, त्यांना आथिर्क भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे मठाचीवाडी इथून सकाळी सहा वाजता मार्गस्थ होणारी भावीनिमगाव – शहरटाकळी- भातकुडगाव फाटा शेवगाव ही बस नियमित सुरू करण्याची मागणी शालेय विद्यार्थी, प्रवासी व ग्रामस्थ करीत आहेत.

राज्य शासनाने महिलांना बस भाड्यामध्ये पन्नास टक्के सूट दिली तर वयोवृद्धांना मोफत प्रवास आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावातील बसेस बंद करून महिलांची व वयोवृद्धांची चेष्टाच चालवली आहे. बसच्या तिकिटात सवलत आहे.

मात्र, लाल परीच गावांमध्ये येत नसल्याने त्या सवलतीचा उपयोग काय कामाचा असा सवाल या परिसरातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विचारला आहे. शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

तसेच त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगाराच्या विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करावे आणि शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नियमित बस मार्गस्थ करावी. – शहादेव भुमकर, – जेष्ठ नागरिक, मठाचीवाडी. ता. शेवगाव शेवगाव – मठाचीवाडी या मुक्कामी बस पुन्हा चालू करण्यात यावी. यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीचे अनेक वेळा ठराव घेऊन आगार प्रमुख यांना दिले आहेत. मात्र, अद्याप पर्यंत बस चालू न झाल्याने शाळेतील मुले वृद्ध महिला, आजरी पेशंट यांचे बस अभावी मोठे हाल होत आहे.- आशाबाई घुणे, मठाचीवाडी

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts