अहमदनगर बातम्या

विरोधकांनी वकीलांची फौज उभी केली तरीही आपण आमदार होण्यापूर्वी दिलेला ‘तो’ शब्द पूर्ण केला ; आमदार काळे

Ahmednagar News : मी आमदार होण्यापूर्वी कोपरगावच्या पाण्यासाठी संघर्ष करीत ९ दिवस उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्याच वेळी नागरीकांना शब्द दिला होता की मला आमदार केले तर पाणीप्रश्न सोडणार आज तो शब्द पूर्ण करीत कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथे नवीन पाचव्या साठवण तलावाची निर्मिती केली.

हे नवीन तलाव पूर्ण होवू नये, यासाठी विरोधकांनी सुरुवातीपासून विरोध केला. विविध नावाने कोर्टात दावे दाखल केले. आत्तापर्यंत २२ वेळा तारखा झाल्या. मोठमोठ्या वकीलांची फौज लावली तरीही आपण या नव्या तलावाचे काम पूर्ण करुन दाखले. केवळ दाखवले नाही तर जलपूजन करुन कोपरगावच्या नागरीकांना पाणी मिळणार आहे.असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.

यापूर्वी शहरातील महिला भगिनींचे पाण्यामुळे होणारे हाल मला पहावत नव्हते. रस्त्यावर, अंगणात गल्ली बोळात जिथे पहावे तिथे पाण्याच्या टाक्या, टिपडे, डबे पाणी भरण्यासाठी ठेवल्याने रस्त्यावरुन जाता येत नाही, अशी भयानक स्थिती शहरात झाली होती.

मात्र ही परिस्थिती बदलवण्यासाठी आपण राजकारणात उतरलो. विरोधकांनी पाण्याला विरोध केला,अनेकांचा विरोध झुगारून, कोर्ट कचेऱ्या करीत कोपरगावकरांसाठी पाच नंबरचा साठवण तलाव निर्माण केले. आता कोपरगावकरांना मुबलक पाणी मिळणार त्याचा शुभारंभ येत्या रविवारी १५ सप्टेंबर रोजी करणार असल्याची माहिती आ. काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी नगरपालिकच्या चार तलावात जितका पाणीसाठा होता. तितकाच साठा एकट्या पाचव्या नव्या तलावात होणार आहे. पाण्याचा साठा वाढल्याने आता आठ दिवसाड मिळणारे पाणी दोन किंवा तीन दिवसाने देता येईल. जर शहरातील वितरण व्यवस्था बदलली तर दररोज पाणी मिळू शकेल, अशी व्यवस्था केली आहे.

पाचव्या तलावामुळे नगरपालिकेचे म्हणजे नागरीकांच्या कराचे २० कोटी रुपये वाचवले. जर पालिकेला १३१ कोटी रुपये योजनेसाठी १५ टक्के रक्कम भरावी लागणार होती, अर्थात २० कोटी भरावे लागले असते. पण राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्याने ते पैसे वाचले, केवळ पैसेच वाचले नाहीत तर हि योजना पूर्ण होण्यासाठी १० वर्षे लागले असते.

तलाव खोदाईच्या कामात सुरुवातीची माती समृध्दी महामार्गासाठी उचलल्यामुळे १० कोटी रुपये वाचवले. त्याच पैशातून शहरातील वाढीव भागात पाईपलाईन करता आली. येथेही विरोधकांनी माती उचलण्यासाठी कसा विरोध केला हे सर्वश्रुत आहे.

विरोधकांचा विरोध झुगारुन साठवण तलाव निर्माण करण्यात यशस्वी झालो. केवळ तलावाचे काम पूर्ण करुन थांबलो नाही तर धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवून घेतल्याने आपल्याला पाणी भरपूर मिळणार आहे. दर दिड महिन्याला कालव्याला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन पाटबंधारे विभागा सोडणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts