अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- सात वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा व आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले आहे.
आरोपी राहुल सिंग गौंड (रा. कटरा, बलखेडा ता. पाटण जि. जबलपूर, मध्यप्रदेश), अपहृत मुलगी व त्यांच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दि. २३ सप्टेंबर २०१५ रोजी राहुल गौंड याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सात वर्षे एमआयडीसी पोलिसांना या गुन्ह्याचा तपास लागला नाही.
नंतर या गुन्ह्याचा तपास फौजदार भैय्यासाहेब देशमुख यांच्या पथकाने केला व आरोपीसह मुलीला ताब्यात घेतले. दोघांनी विवाह केला होता. त्यांना दोन मुलेही झाली आहेत.