अहमदनगर बातम्या

चेक बाऊन्स करणे पडले महागात चक्क २ वर्षे सक्तमजुरी ; ५९ लाख रुपये दंड भरपाईचा आदेश…

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Ahmednagar News :-आपण अनेकदा पैशाचे व्यवहार करताना चेकने करतो. श्रीगोंदा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक प्रकाश दादासाहेब निंभोरे यांच्यावर कर्ज परतफेड प्रकरणी दिलेला

२९ लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील कोर्टाने २ वर्षे सक्तमजुरी शिक्षा व ५९ लाख रुपये दंड भरपाई देण्याचा निकाल दिला.

निंभोरे यांनी येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटी मधून १ वर्ष मुदतीसाठी २५ लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र वेळेवर हफ्ते न भरल्याने वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट ने हफ्ते भरण्यास सांगितले असता

निंभोरे यांनी २९ लाख रुपयांचा बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा शाखेचा धनादेश दिला सदर धनादेश न वटल्याने वृद्धेश्वर मल्टिस्टेटने कोर्टात दावा दाखल केला. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts