कोरोनानंतर केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी अडचणीत

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-कांदा निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असून, कांदा निर्यातबंदी त्वरीत उठवून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत तसेच ईमेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशीयारी यांना पाठविले आहे. देशाचे डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड यांनी भारतातील कांदा,

कांदा पावडर आणि कांद्याचे प्रक्रिया केलेले पदार्थाची निर्यात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सोमवार दि.14 सप्टेंबर रोजी निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक निर्गमीत केले आहे. केंद्र सरकार कांदा व संबंधीत मालाची निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळून शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढून शेतकर्‍यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत होता. कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी हवालदिल झाला होता. कांद्यास चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग समाधानी होता.

मात्र केंद्र सरकारने कांद्याची निर्याबंदी लागू केल्याने कांद्याचे भाव कोसळणार आहे. शेतकरी सध्या अडचणीत असून, त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कोरोना संकटामुळे यामध्ये आनखी भर पडली आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकर्‍यांना देशोधडीस लावण्याचे पाप करीत आहे.

शेतकर्‍यांना या संकटकाळात आधार देण्याची गरज आहे. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना पुन्हा रडण्याची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून,

तातडीने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातबंदी त्वरीत उठवून काढलेला अध्यादेश रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने लहामगे यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts