अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : शेतकऱ्यांच्या उसाला जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव !

Ahmednagar News :  साखर उद्योगातील राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ओंकार या ग्रुपच्या माध्यमातून सुरू होणारा हिरडगाव येथील गौरी शुगर शेतकऱ्यांच्या उसाला जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव देऊन, जिल्ह्यात आग्रेसर राहणार असल्याची घोषणा ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी हिरडगाव येथे बोलताना केली.

हिरडगाव येथील गौरी शुगरच्या रोलर पुजनचे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे आणि रेखा बोत्रे यांचे हस्ते. तर २४० केपीएलडी क्षमतेच्या डिसलरी प्रकल्पाचे भुमीपुजन प्रशांत व शारदा बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

बोत्रे यांनी पुढे बोलताना सांगितले की, आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून हा आधुनिक प्रकल्प उभा केला होता. त्यांचे हे व्हिजन मी येत्या काळात पूर्ण करत मागील १२ वर्षापासून शेतकऱ्यांचा सुरू असलेला वनवास संपविणार आहे.

नुसती साखर निर्मिती करून ऊसाला भाव देता येणार नाही, व्यवसाय व व्यवहार डोळ्यासमोर ठेवून डिसलरी क्षमता २४० केपीएलडीने वाढविणार असून, त्यातून दररोज तीन लाख लिटर इथेनॉल निर्माण होणार आहे. २४ टीपीएच क्षमतेचा सीएनजी गॅस प्रकल्प तयार करण्यात येईल.

प्रेसमड पासुन दररोज ४०० मे टन पॉटश तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत येत्या सहा महिन्यात करणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात मुख्य व्यवस्थापक रोहीदास यादव म्हणाले की, बोत्रे यांनी गौरी शुगरच्या माध्यमातुन तरुणांना मोठी संधी दिली असून, येत्या गळीत हंगामात कारखाना सुरु करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली असल्याचे सांगितले. यावेळी मिलिंद दरेकर यांनी मनोगत व्यक्त करत कारखान्याच्या गळीत हंगामाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी उस्मानाबाद येथील लक्ष्मी शुगरच्या चेअरमन स्मिता पाटील, गणेशराव डोईफोडे संपतराव दरेकर, संतोष दरेकर, गंगाराम दरेकर, दिनेश दरेकर, सचिन चौधरी उपस्थित होते सुत्रसंचालन नवनाथ देवकर यांनी केले तर आभार गौरी शुगरच्या चेअरमन गौरी बोत्रे यांनी मानले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts