अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- राहुरी विधानसभा मतदार संघातील 32 गावांपैकी तिळापूर हे शेवटचे गाव आहे. मुळा-प्रवरा नदीच्या संगमावरती तिळापूर ह्या गावात पुरातन महादेवाचे मंदिर आहे. ह्या देवस्थान ट्रस्टचा तीर्थक्षेत्र विकास मध्ये ‘क’ वर्गात समाविष्ट झालेले असून हाजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
त्या मंदिराच्या परिसरात पर्यटन विकासतुन विविध विकास कामे झाली आहे. परंतु दुर्दैवी बाब आशी की त्या देवस्थान कडे जाण्यासाठी रस्त्या नाही. कित्येक वर्ष झालीत त्या रस्त्यासाठी कुठलाही निधी मंजूर झालेला नाही. अतिशय वाईट परिस्थिती त्या रस्त्याची निर्माण झालेली आहे.
वेळोवेळी आमदार व खासदारना पाठपुरावा करून रस्त्याची काम मार्गी लागत नाही. शेवटी हताश झालेल्या गावातील तरुणांनी रस्त्यावर उपोषण केले. तहसीलदार व आमदार लहूजी कानडे यांना निवेदन देण्यात आले होते. 15 दिवसात रस्ता बघायला येतो काम मार्गी लावतो, असे सांगितले होते.
परंतु कुठलीही दखल घेतली गेली नाही. निवडणूकी पुरते येतात आणि परत ह्या परिसरात फिरकत देखिल नाही. लोकप्रतिनिधी झाल्या पासून आमदार मोहदय ह्या भागात अजून आले देखील नाही. 32 गावातील ह्या दक्षिण भागातील गावांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
सर्व सामान्य लोकांनी आपले प्रश्न नेमके कुणाकडे मांडायचे? खासदार तर 10 वर्षात कधी ह्या परिसरात आले देखील नाही. अतिशय संतापाची लाट निर्माण होत आहे. मीटर मध्ये रस्ता मंजूर झाल्याच कित्येक दिवसापासून सांगत आहे. सर्व सामान्य शेतकरी वर्गाला खूप मोठया प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे.
रस्त्यावर 5 फूट चिखल झाला असून पायी जाणे मुश्किल झाले आहे. शेवटी हाताश झालेल्या गावातील तरुणांनी उपोषणाचा मार्ग हाती घेतला. संगमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रस्त्यावर उपोषण करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देत आपला राग व्यक्त केला. या प्रसंगी गावातील तरुण जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांधकाम विभागचे अभियंता पाटील व हनसे यांनी आश्वासन दिल्या नंतर उपोषण सोडण्यात आले.