अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- राहुरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्यांना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी संघटनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुरूवारपासून उपोषण सुरू केले आहे.(SP Office)
यामध्ये राहुरी तालुकाध्यक्ष सनी काकडे, महासिचव बाबासाहेब गायकवाड, राधाकिसन पाळंदे, गणेश पाळंदे, विजय पाळंदे आदी सहभागी झाले आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेजर सुरेश अंतु पाळंदे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत 13 नोव्हेंबर 2021 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत आरोपींना तात्काळ अटक होणे गरजेचे व कायद्यानुसार अपेक्षीत होते, परंतू आजपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही.
आरोपींच्या दहशतीमुळे आणि पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीने फिर्यादी मेजर सुरेश अंतु पाळंदे यांचे दुर्दैवी निधन झाले. तरीही आरोपींना अटक झालेली असून अटक करण्यासाठी उपोषण करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.