अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचास अटक करण्यासाठी उपोषण ! पोलिस सोयिस्करपणे दुर्लक्ष

Ahmednagar News : रस्त्याने जात असताना पाठीमागून चारचाकी गाडीने धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद खंडू पवार यास पोलिसांनी तात्काळ अटक करावे.

या मागणीसाठी दिलीप रामभाऊ कोकाटे यांनी उपोषण करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार यांच्यावर रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीस पाठीमागून चारचाकी गाडीने धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने पवार यास जानेवारीमध्ये तात्पुरता जामीन दिला होता. नंतरच्या काळात जिल्हा न्यायालयाने पवार याचा जामीन फेटाळला असून त्यानंतर पवार याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता.

मात्र खंडपीठाने तो २१ फेब्रुवारी २०२४ रोजीच जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे सरपंच पवार यास पोलिसांनी अटक करणे अपेक्षीत असताना पोलिसांकडून अद्याप तशी कोणतीच कारवाई करण्यात आली नसून, सरपंच पवार मोकाट फिरत आहे.

दरम्यान या काळात तो आपल्या मोबईलच्या स्टेटसला पोलिसांना आव्हान दिल्याचे तसेच आपले लोकेशन कळावे अशा पद्धतीचे स्टेटस ठेवत आहे. मात्र नगर तालुका पोलिस त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करत आहेत.

तरी सरपंच पवार यास तात्काळ अटक न केल्यास दि.७ मार्च २०२४ रोजी आपण सहकुटुंब आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा कोकाटे यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts