अहमदनगर बातम्या

बापरे ! केसाला धरलं, चाकूने गळा चिरला.. ‘अशी’ झाली रेखा जरेंची हत्या, प्रथमदर्शनी साक्षिदाराने सगळंच सांगितलं..

Rekha Jare Murder Case : अहमदनगर जिल्हा न्यायालयात रेखा जरे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरु असून प्रथमदर्शनी साक्षीदार रेखा जर यांच्या आई सिंधू वायकर यांनी साक्ष नोंदवली आहे.

दरम्यान काल (दि.८ डिसेंबर) त्यांची आरोपींच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली. यावेळी त्यांनी खुनाचा थरार कथन केला. हा थरार सांगतानाच त्यांना अक्षरशः रडू कोसळले होते. यावेळी मुख्य आरोपी बाळ बोठेसह इतर आरोपी दूरदृष्यप्रणालीद्वारे हजर होते.

 अशी झाली हत्या

मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी चापट मारून चारचाकी थांबविण्याचा इशारा केला. चारचाकी थांबविताच एकाने रेखा जरे यांच्या केसाला धरून धारदार चाकूने गळा चिरला व हत्या केली असं त्यांनी सांगितलं आहे.

आरोपींच्या वकिलांनी हत्याकांडाच्या घटनाक्रमाबाबत विचारणा केली की, रेखा जरे यांची हत्या झाली, त्यावेळी तुम्ही त्यांच्यासोबत होतात. रस्त्याने येताना आरोपींशी रेखा जरे यांचे वाद झाले होते का? यावर वायकर यांनी ऊत्तर दिल.

त्या म्हणाल्या, रस्त्याने येताना त्यांचा कुणाशीही वाद झाला नव्हता. पाठीमागून मोटारसायकलवरून दोघेजण आले. त्यांनी आमचे वाहन थांबवले, त्यानंतर काही वेळातच एकजण दुचाकीवरून उतरला, त्याने तुला गाडी चालविता येत नाही,

तर चालविते कशाला, असे म्हणत रेखाचे केस धरून धारदार चाकूने गळ्यावर वार केले. मी पाठीमागे बसलेले होते. तिला मी पाठीमागून धरले, तोवर ती रक्तबंबाळ झाली होती असा घटनाक्रम त्यांनी सांगितला.

आईला रडू कोसळले, वकिलांनी पिण्यासाठी पाणी देत शांत केले..

रेखा जरे यांच्या आई वायकर या प्रथमदर्शनी साक्षीदार आहेत. उलटतपासणी वेळी त्यांनी न्यायालयात घटनेचे वर्णन केले. परंतु यावेळी त्यांना न्यायालयातच रडू कोसळले. त्यानंतर त्यांना तेथील महिला वकिलांनी पिण्यासाठी पाणी देत शांत केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office