अहमदनगर बातम्या

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठे विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.(Rekha Jare murder case)

 

म्हणून बोठे याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई दाखल व्हावी अशी मागणी रुणाल जरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान या निवेदनात रुणाल जरे यांनी, म्हंटले आहे कि, आरोपी बोठे याचा गत दहा वर्षांचा इतिहास पाहता त्याच्या विरोधात हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, सुपारी देणे, खून असे संघटित गुन्हेगारीचा लेखाजोखा आहे.

आरोपीवर मोक्का नियमानुसार दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आणि प्रलंबित आहे, तसेच आरोपी बोठे विरोधात सुपा,पारनेर,कोतवाली, तोफखाना, राहुरी या ठिकाणी गुन्हे दाखल आणि प्रक्रियेत असल्याचे जरे यांनी म्हणले आहे.

आरोपीवर गंभीर गुन्हे असले तरी राजकीय वरदहस्त वापरल्याने त्याच्यावर गंभीर कारवाई झालेली नव्हती ती केली जावी असे निवेदनात म्हंटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office