अहमदनगर बातम्या

अखेर ठरले..! भाजपकडून राहुरी विधानसभा मतदार संघात डॉ. सुजय विखे नव्हे तर ‘हे’ असतील उमेदवार ?

Ahmednagar News : नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत माझ्या विजयासाठी भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी प्रचंड मेहनत घेतली.

त्यांच्यामुळेच नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. तसेच यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही कर्डिले यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्यांच्यामुळेच नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे.

आजवर मी त्यांच्या त्यांच्या मार्गदशनाखाली राजकारण करत आलेलो आहे. त्यामुळे त्या नेतृत्वाच्या अधीन राहून मी काम करणार आहे. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले हेच उमेदवार असतील. त्यांच्या विजयासाठी आता मी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया भाजपा नेते माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील बैठक संपल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान कालच भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपण राहुरी व संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून चर्चांना ऊत आला आहे.

नगर जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूकीबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी मतदारसंघाचा आढावा घेत आहे.

अवघ्या काही महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्या आहेत. त्यातच डॉ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढविण्याबाबत वक्तव्य केले. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील राहुरी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उतरतील असा अंदाज बांधला जात होता.

परंतु,अवघ्या १२ तासातच त्यांनी यु टर्न घेतला आहे. त्यामुळे मात्र राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज व्यर्थ गेले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांनी प्रचंड मेहनत घेतली.

तसेच कर्डीले हे या मतदार संघातून दोनदा आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे राहुरी मतदारसंघात कर्डिले हेच लढवणार आहेत. मात्र याबाबत पक्षश्रेष्ठी त्यांना जो निर्णय योग्य तो निर्णय घेतील, परंतु सध्या तरी तेच या मतदारसंघातुन लढणार असल्याचे विखे म्हणाले.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts