Ahmednagar News : गणेशोत्सवामुळे सर्वत्र भक्तीमय वातारण आहे. सर्वत्र स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून भिंगार बस स्टॉप येथील कचरा डेपोत अनेक दिवसांपासून कचरा साचलेला आहे.
या बसस्थानकाशेजारील कचरा डेपोला बुधवारी (दि.११) सायंकाळी मोठी आग लागली होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. नागरिकांनी पाण्याचा टँकर बोलावून पाण्याचा मारा करत ही आग विझवली.
या कचरा डेपो बाबत कॅन्टोन्मेट बोर्ड प्रशासनाला निवेदन देवूनही त्यांनी दखल न घेतल्याने ही आग लागल्याचा आरोप काँग्रेसचे भिंगार शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी केला आहे.
सध्या गणेशोत्सव सर्वत्र सुरु आहे. सर्वत्र भक्तीमय वातावरण असून भिंगार शहरामध्ये सर्वत्र स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून भिंगार बस स्टॉप येथील कचरा डेपोत अनेक दिवसांपासून कचरा साचलेला आहे.
या संदर्भात चाबुकस्वार यांनी कॅन्टोन्मेट बोर्डाला मागील शुक्रवारीच पत्र दिले होते. ज्या ठिकाणी हा कचरा आहे.
तो कचरा इतर ठिकाणी टाकण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे येथे मोठी लाग लागली. त्यामुळे भिंगार बसस्टॉप येथे वातावरण दुषित होत आहे.
या आगीमुळे कोणतीही दुर्घना घडू शकते. कॅन्टोन्मेट बोर्डाने तात्काळ सेवा देणे गरजेचे होते, परंतु येथे कॅन्टोन्मेट बोर्डाने दुर्लक्ष केले असून येथील नागरीकांनीच पुढाकार घेवुन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या परिसरात सकाळी संध्याकाळी जनावरे व असतात तसेच महिला या ठिकाणी भंगार गोळा करण्यासाठी येत असतात. यामुळे जिवितहानी होऊ शकते व जनावरे देखील दगावण्याची शक्यता आहे.
तरी भिंगार कॅन्टोन्मेट बोर्डाने या ठिकाणी टाकण्यात आलेला कचरा इतर ठिकाणी हलवावा अन्यथा मोठ्या स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा चाबुकस्वार यांनी दिला आहे.