अहमदनगर बातम्या

अज्ञात व्यक्तीने लावली आग : लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  या दिवसात अनेक ठिकाणी वनविभागाच्या जंगलास आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती नष्ट होते. नुकतीच श्रीगोंदा शहराजवळ असलेल्या पेडगावरोडवरील वनविभागाच्या जंगलास भर दुपारी आग लागली.

याबाबत स्थानिक रहिवासी व संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अरविंद कापसे यांनी अग्निशमन दलास याबाबत कल्पना दिली. मात्र तोपर्यंत सुमारे एक हेक्टर क्षेत्रावरील वन आगीच्या भक्षस्थानी पडले.

या भागात वनविभागाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून यामध्ये ससे, हरिण, तरस, दुर्मिळ पक्षी, वन्यजीव असून या जंगलाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे वनसंपत्ती जळून खाक झाली.

ही बाब स् थानिक रहिवासी कापसे यांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलास याबाबत कल्पना दिली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत ही आग आटोक्यात आनली मात्र तरीही सुमारे एक हेक्टर क्षेत्रावरील वनसंपत्ती आगीच्या भक्षस्थानी पडली.

वन विभागाच्या गलथान कारभारामुळे वनविभागातील लाखो रुपयांची नैसर्गिक संपत्ती जळून खाक झाली आहे. दरम्यान वनविभागाच्या क्षेत्राला आग लागल्या बाबत माहिती वनविभागाचे अधिकाऱ्यांना दिली असता

त्यांनी कर्मचारी नसल्याचे कारण देत आग विझविण्यास असमर्थता दर्शविल्याची गंभीर बाब समोर आली. नंतर आग विझविण्यासाठी ५ कर्मचारी हजर झाले मात्र कर्मचाऱ्यांना येण्याआगोदरच स्थानिकांनी लागलेली आग विझविली होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts