Ahmednagar News : कोपरे धरण रद्द होण्याची कारणे जाणून घेवून जनशक्तीच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी राजकीय आरोप करावेत. हनुमान टाकळीच्या हनुमंताची मुर्ती समर्थ रामदासांनी स्वहस्ते स्थापन केलेली आहे.
ती मुर्ती इतरत्र हलविता येत नाही. म्हणुन व कोपरे धरण होण्यास त्यावेळी अनेक गावातील गावकऱ्यांनी विरोध केला होता. राजळे कुंटुबावर आरोप करताना काकडे यांनी विचार करावा, अशी टिका बाजार सममितीचे सभापती व हनुमान टाकळी येथील हनुमान देवस्थानचे सचिव सुभाषराव बर्डे यांनी केली आहे.
सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार गाव वाडी वस्तीवर मतदारांशी संवाद साधत आहेत. अशा एका संवाद दौऱ्यातच हर्षदा काकडे यांनी केलेले वक्तव्य सध्या पाथर्डी, शेवगाव तालुक्यात चांगलेच चर्चेत आहे.
राजळे कुटुंब व हनुमान टाकळी येथील हनुमान मंदिर यामुळे कोपरे धरण झाले नाही. त्यामुळे शेवगाव तालुका पाण्यापासून वंचित राहिला,असे वक्तव्य हर्षदा काकडे यांनी केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते. शेवगाव तालुक्यातील बापुसाहेब पाटेकर हे यावेळी उपस्थीत होते.
यावेळी बोलताना बर्डे म्हणाले, हर्षदाताई काकडे यांनी राजळे कुटुंबावर कोपरे धरण रद्द केल्याचा आरोप केला आहे. हनुमान टाकळीचे हनुमानाचे मंदीर हा आमच्या आस्थेचा विषय आहे. समर्थ रामदास स्वामींनी गाईच्या शेणापासून ही मुर्ती तयार केलेली आहे. ती मुर्ती हलविता येत नाही.
हा इतिहास काकडे यांनी समजुन घ्यावा. धरणाला विरोध नव्हताच. समर्थ रामदास स्वामी यांनी गायीच्या शेणापासून येथील हनुमान मूर्ती स्वहस्ते प्रतिष्ठापित केली आहे. ती हलविणे शक्य नसल्याने मंदिर वाचवा, अशी सार्वत्रिक भावना होती. तीच भूमिका उच्च न्यायालयात मांडली. कोपरे धरणाच्या पाणलोटात गाव, तलाव नालाबंडिंगसह बंधारे झालेले आहेत. त्यामुळे धरणात पाणीच येणार नसल्याचा लेखी अभिप्राय सदर प्रकल्प अभियंता यांनी दिलेला आहे. त्या मुद्द्यांच्या आधारे कोपरे धरण रद्द झाले आहे.
धरणात होणारा पाणी साठा व राजळे कुंटुबाने वांबोरीचारीच्या माध्यमातुन मुळा धरणातुन आणलेले पाणी, केलेले बंधारे व जलसंधारणाची कामे यामुळे हा भाग ओलिताखाली आलेला आहे.