अहमदनगर बातम्या

आधी मैत्री मग लग्नाचे आमिष अन अत्याचार; अल्पवयीन मुलगी गर्भवती: नगरच्या तरुणावर गुन्हा दाखल

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात रोज अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, फूस लावून पळवून नेने, मारहाण करणे अशा प्रकारच्या एकापाठोपाठ अनेक घटना घडत असल्याच्या समोर येत आहेत. त्यामुळे मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवावे की नाही या मानसिकतेत पालक आहेत.

संगमनेर तालुक्यात लव्ह जिहादचा गंभीर प्रकार समोर आला असून त्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यातील एक महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलीची सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तिला घेऊन जाण्यासाठी एक पर जिल्ह्यातून तरुण आला होता. मात्र शिक्षकांच्या सतर्कतेमुळे या मुलीला पळून नेण्याचा प्रयत्न फसला.

यापाठोपाठ नगर शहरात एका तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. यातून ती पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे लक्ष्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी नगर शहरात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश अंबादास कस्तुरी (रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

नगर शहरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची राजेश सोबत ओळख झाली. ते दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत होते. ते बोलणे मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी राजेशच्या घरी जावून त्यांना सांगितले होते. त्यानंतर राजेश मुलीसोबत काही दिवस बोलत नव्हता.

पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर राजेशने मुलीला मोबाईल दिला होता. त्या मोबाईलवरून मुलगी राजेश सोबत बोलत होती. राजेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतरही त्याने तीन ते चार वेळा मुलीला लॉजवर नेले व तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान तिला मासिक पाळी न आल्याने मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पीडिताने नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी राजेश कस्तुरी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts