Ahmednagar breaking : जनावरे चोरी करणारे चोर समजून गावकऱ्यांनी तिघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघे जबर जखमी झाले. दरम्यान यातील एकजन मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजल्यानंतर पोलिस तातडीने घटनस्थाळी दाखल झाले असून, पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. मात्र कारवाईच्या भितीने गावच रिकामे झाल्याची चर्चा सुरू आहे.
हि अगदी सिनेमाला शोभेल अशी घटना नगर तालुक्यातील पांगरमल परिसरात घडली. बुधवारी रात्री चोर असल्याच्या संशयावरून तिघांना पांगरमल परिसरात ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. जमावाने केलेल्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले.
तर या मारहाणीत जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजल्यानंतर पोलिस तातडीने घटनस्थाळी दाखल झाले असून कारवाईच्या भितीने गाव रिकामे झाल्याची चर्चा सुरू आहे.
नगर तालुक्यातील पांगरमल येथे गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांची जनवारे चोरी होत असल्याचा प्रकार घडत होता. या संदर्भात ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देखील दिले होते. चोरीच्या घटनेमुळे गावकर्यांमध्ये मोठी चिड निर्माण झाली होती.
त्यातच चोर असल्याच्या संशयावरून बुधवारी(दि.०३) रात्री गावात तिन इसम आल्याची चर्चा वार्यासरखी गावात पसरली.गावात जमा झालेल्या जमावाने त्या तिघांना पकडत मारहाण केली. या मारहाणीत एकाचा दुर्देवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र कारवाईच्या भिंतीने गावातील लोक गायब झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला असल्याची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.