Ahmednagar News : तुझ्याकडे काम आहे, लवकर ये, असे सांगून बोलावून घेत मित्रावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार पुणे रोडवरील नेवासकर पेट्रोलपंपासमोर रविवारी (दि. ६) रात्री घडला. सागर दत्तात्रय जाधव (रा. २९, रा. निंबोडी, ता. नगर) असे हल्ला झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक केली. मात्र, हल्ला का केला, याबाबत दोघा मित्रांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे हल्ल्यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. राम अंकुश इंगळे (वय २८, रा. निंबोडी, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
आरोपीने सागर जाधव यांना पुणे रोडवरील नेवासकर पेट्रोलपंपासमोर बोलावून घेतले. सागर जाधव हेही रविवारी सायंकाळी पेट्रोलपंपासमोर येऊन थांबले. तिथे उपस्थित असलेल्या आरोपीने जाधव यांच्यावर चाकूने वार केले. त्यात ते जखमी झाले.
त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी राम इंगळे हा निंबोडी (ता. नगर) येथे आहे, अशी गोपनीय माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्याआधारे कोतवाली पोलिसांनी निंबोडी सापळा लावून आरोपीला अटक केली.