अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शाळेसाठी २ कोटी 3 लाखांचा निधी मंजूर !

Ahmednagar News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड ) येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून,

यासाठी दोन कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार इतका भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. आ. प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे चौंडी शाळेला भरीव निधी मंजूर झाला आहे.

त्यामुळे चोंडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्‍त केले जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन २०२२-२३ अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री वेवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांशी संबंधित १० ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा केली होती तसेच विधिमंडळ सदस्यांच्या मागणीच्या अनुषंगाने यात तीन ऐतिहासिक गावांचा समावेश करण्यात आला होता.

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील गाभा समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर मुख्य अभियंता (प्रकल्प) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.

सरकारने (१४३०.२० लक्ष ) चौदा कोटी तीस लक्ष वीस हजार रूपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असून, तसा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरुषांशी संबंधित ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसित करण्यासाठी शासनाने भरीव निधी मंजूर केला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव असलेल्या चौंडीच्या जिल्हा परिषद शाळेसाठी सरकारने सर्वाधिक निधी मंजुर केल्याबद्दल आमदार प्रा. राम शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सरकारचे आभार मानले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts