अहमदनगर बातम्या

लसीकरणाशिवाय आता पेट्रोल आणि गॅस मिळणार नाही…वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासनाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाशिवाय पेट्रोल, गॅससह शासकीय सेवा मिळणार नाही.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा अपेक्षित टप्पा न गाठल्याने जिल्ह्यातील निर्बंध कायम असल्याने आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, औरंगाबाद जिल्हा निर्बंधमुक्त करण्यासाठी आम्ही काही निर्णय घेतले आहे.

त्यामुळे यापुढे आता पेट्रोल,गॅस, सेतु सुविधा, RTO कार्यालयातील वाहन संबंधित कागदपत्र, मॉल, परमिट रूम किंवा दारू विक्री करताना यापुढे कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच सुविधा दिली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्यावेळी सुद्धा पेट्रोल देताना लसीकरण केल्याचं प्रमाणपत्र असणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता.

मात्र यावेळी हा गोंधळ टाळण्यासाठी पेट्रोल पंपावर एक पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि पेट्रोलपंप चालक यांची सांगड घालून हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts