Ahmednagar News : अहमदनगर – बीड – परळी हा एकूण २६१.२५ किमी लांबीच्या प्रकल्पाचे काम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. शेतकरी, व्यापारी व प्रवाशांसाठी महत्वपूर्ण असणारा हा प्रकल्प आहे. साधारण वर्षभरापूर्वी अहमदनगर ते न्यू आष्टी रेल्वेची फेरी सुरू करण्यात आली होती.
आता न्यू आष्टी ते इगनवाडी हा ६७.१२ कि.मी.चा रेल्वेमार्ग पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे आता लवकरच म्हणजे साधारण या वर्षाखेर अहमदनगर ते इगीनवाडीपर्यंत रेल्वे धावणार आहे. अहमदनगर ते इगनवाडीपर्यंत १३३.३ किमीचे काम आता पूर्णत्वास येत आहे.
अनेक वर्षांचे बीडकरांचे अधुरे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. हा मार्ग एकूण २६१.२५ किमी अंतर पार करतो. दरम्यान, २३ सप्टेंबर २०२२ रोजी ६६.१८ किमी लांबीचा अहमदनगर-न्यू आष्टी मार्ग पूर्ण झाला आणि नियमित गाड्याही सुरू करण्यात आल्या. नवीन आष्टी ते इंगवाडी हा ६७.१२ किलोमीटरचा मार्ग या वर्षाच्या अखेरीस दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होणार आहे
या रेल्वे प्रकल्पासाठी एकंदरीत ४ हजार ८०८ कोटी खर्च येणार आहे. आजपर्यंत या प्रकल्पासाठी ३६४६.०९ कोटी खर्च केले आहेत. या कामाची एकूण भौतिक प्रगती- ७८%, जमीन संपादन पूर्ण-१८२१ हेक्टर पैकी १८०६ हेक्टर म्हणजे ९९% जमिन संपादीत झाली आहे. आता इगनवाडी ते परळी हा १२७.९५ कि.मी. रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे.
न्यू आष्टी ते इनगवाडी आतापर्यंत पूर्ण झालेली कामे:
अर्थ वर्क-४३० LCum/४१८ LCum (९७%)
प्रमुख पूल- ६४/४९ (७७%)
छोटे पूल/RUB- ३०२/२४९ (८२%)
रोड ओव्हर ब्रिज- ६५/१४(२१%)
रोड अंडर ब्रिज- १३०/११० (८५%)
स्टेशन इमारती- २१/१० (२९%)
ट्रॅक लिंकिंग-२६१/११५ ११५ किमी (४४%)
पॉवर लाईन क्रॉसिंग- ६२६/५६८(९१%)
बॅलास्ट पुरवठा-७.५२/६.४४ एलसीएम (८६%)
विद्युतीकरण- निविदा मंजूर झाली.