अहमदनगर बातम्या

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेतीची हरितक्रांती

Bhandardara Dam : भंडारदरा धरण शंभरीकडे झुकत असून धरणाचा ९७वा वाढदिवस रविवारी भंडारदरा धरणावर शेंडीच्या ग्रामस्थांसह अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात येऊन जलपूजन करण्यात आले.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात उंचीवर व दगडात बांधकाम केलेले ब्रिटीशकालीन धरण आहे. भंडारदरा धरणाचे काम १९१० साली सुरु होऊन १९२६ साली ते बांधुन पुर्ण झाले.

१० डिसेंबर १९२६ रोजी ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड विल्सन यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले. भंडारदरा घरणाच्या पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेतीची हरितक्रांती झाली असुन उत्तर नगर जिल्ह्याला एक प्रकारे वरदानच ठरले आहे.

रविवारी १० डिसेंबर रोजी भंडारदरा धरणाचा ९७ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात पार पडला. या वेळी भंडारदरा धरणावर फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती.

शेंडी गावचे माजर सरपंच दिलीप भांगरे, धरण शाखाधिकारी अभिजीत देशमुख, राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक प्रविण दातरे यांच्या हस्ते धरणाची व जलसाठ्याची विधीवत पुजा करत धरणाला कलशासह श्रीफळ अर्पण करण्यात आले.

यावेळी दिलीप भांगरे यांनी ब्रिटीशांच्या कल्पक बुद्धीचे कौतुक करत या पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट कसा झाला याची माहीती दिली. तर अभिजीत देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.

धरणावर पुस्तक निर्माण करणारे विकास पवार यांनी भंडारदरा धरणाच्या निर्मितीचा इतिहास सांगतांना पुस्तक निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे यावेळी आभार मानले.

यावेळी शेंडीचे माजी सरपंच दिलीप भांगरे, धरण शाखाधिकारी अभिजित देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, डॉ. दिलीप बागडे, शेंडीचे प्राचार्य दिलीप रोंगटे, जितेंद्र भांगरे, रानकवी तुकाराम धांडे, रानकवी गायकवाड,

स्वप्निल शहा, विकास पवार, सचिन नेवासकर, ज्ञानेश्वर अवसरकर, वसंत सोनवणे, धरणावर सुरक्षेसाठी असणारे पोलिस कर्मचारी बोबडे, पथवे, अशोक गाडे, परते, धरण कर्मचारी चंदर उघडे, चंद्रु भगत, सुरेश हंबीर, बाळासाहेब भांगरे, रावजी सुरनर, बांडे बाबा, अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींसह कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts