अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेच्या सभागृहात मुश्रीफ यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना पारनेरच्या नगरसेवकांच्या स्थित्यंतरावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी सरकारची समन्वय समिती स्थापन केली आहे.
मात्र, आपल्या तीन पक्षातील लोकं आपल्या-आपल्यातच पक्षांतर करत असतील तर काय करावे, याचा काहीही विचार झालेला नाही़ भाजपला रोखायचे असेल तर यावर मार्ग काढावा लागेल.
तसेच सप्टेंबरपर्यंत कोरोना रूग्ण संख्या कमी होऊन नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews