अहमदनगर बातम्या

हभप इंदुरीकर महाराज म्हणतात ; सुटीचा दिवस असूनही मुलं शाळा, कॉलेजला कस काय जातात याबाबत पालकांनी… !

Ahmednagar News : आज आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यासाठी आपण आपल्या धर्म आणि संस्कृतीचे जतन केले पाहिजे. संतांची शिकवणच आपल्याला या जीवनातून तारु शकतो. त्यासाठी अध्यात्माची गोडी निर्माण झाली पाहिजे.

त्यासाठी आपल्या मुलांवर आज संस्कार करण्याची गरज आहे. आज आपली मुलं काय करतात, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. सुटीचा दिवस असूनही मुलं शाळा कॉलेजला कस काय जातात याबाबत पालकांनी त्यांना विचारणे गरजेचे आहे. असे असे प्रतिपादन प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले.

माळीवाडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात हभप इंदोरीकर महाराज यांचे किर्तन झाले.  याप्रसंगी महाराजांनी आपल्या खास शैलीत पालकांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले कि,सध्या पाश्चमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे.

त्यामुळे कितीही शिक्षण झाले, कितीही पैसे कमावयला लागले तरी समाधान नाही. सर्व भौतिक साधने आज आपल्याकडे आले उपलब्ध आहेत, परंतु अनेक व्याधींनी आपल्याला ग्रासलेले आहे.

त्यामुळे या साधनांचाही आपणास उपभोग घेता येत नाही. त्यासाठी समाधान मिळवायचे असेल तर अध्यात्माकडे वळले पाहिजे. आपल्या दैनंदिन कामकाजातून थोडावेळ अध्यात्मासाठी दिला पाहिजे. तेव्हाच आपण सुखी होऊ शकतो.

आपल्या संतांना आपले जीवन सुखी होण्यासाठी बरेच काही देऊन गेले आहेत, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. संत साहित्यातूनच आपले जीवन सुखी समाधानी होऊ शकते.

आज थोडे चांगले दिवस आले की मनुष्याच्या अंगी ‘मी’ पणा आणि त्यातून अहंकार निर्माण होतो. अहंकारी मनुष्य कधीच एकाग्रता करु शकत नाही, तो नेहमीच विचारांच्या गर्तेत अडकून जातो.

आज नाते-संबंध दुरावत चाललली आहेत, हीच नाते आपणाला संकटकाळी उपयोगी पडणार आहेत तेव्हा मी पणा सोडला पाहिजे. आई- वडिलांना सांभाळा तेच खरे आपले दैवत आहे, तिच खरी भक्ती आहे.

आज पुस्तकी ज्ञाना पेक्षा जीवनातील ज्ञानाला महत्व द्या, ज्याला जीवनाचे गणित समजले तोच पुढील काळात यशस्वी होऊ शकतो, मोबाईलमुळे संवाद संपला आहे. माणसे एकलकोंडी झाली आहे. विशेषतः मुलांनी मोबाईल वापर कामापुरताच करावा.

मोबाईलमध्ये आपला वेळ घालविण्यापेक्षा आपल्या धर्मग्रंथाचे वाचन केल्यास आपल्या ज्ञानात भरच पडेल. वृक्षारोपण, शिक्षण, अवयव दान, पर्यावरण, स्वच्छता, मुलगी वाचवा आदि विषयांवरही अनेक उदाहरणातून प्रबोधन केले. कीर्तनास भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts