अहमदनगर बातम्या

ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात रस्त्यावर साचले कचर्‍यांचे ढिग

3 years ago

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात रस्त्यावर कचर्‍यांचे ढिग झाले आहेत. सावेडी उपनगरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून घंटा गाड्या बंद झाल्या असून,

घंटा गाड्यात कचरा टाकणारे नागरिक गाडी येईल मग कचरा टाकू, असा विचार करुन दारात कचरा गोळा करुन वाट पाहत आहेत,

पण गाड्याच बंद झाल्याने कचरा टाकणार कोठे? अशी अवस्था उपनगरात झाली असल्याने स्थानिक नगरसेवक यांनी मनपा आयुक्तांना जाब विचारण्यासाठी कार्यालयात आले असता महापालिका आवारातच कचर्‍याचे साम्राज्य त्यांना दिसले.

याबाबत संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी बाहेर चला, असे सुचविले.

यावेळी इमारतीजवळच ही परिस्थिती आहे तर सावेडी उपनगरात काय अवस्था असेल हे त्यांनी बोलून दाखविले. या बाबत संबंधित जबाबदार अधिकार्‍यांना जाब विचारावा,

अशी मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्त गोरे यांनी याबाबत चौकशी करुन संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही दिली व आरोग्य अधिकार्‍यांशी तातडीने चर्चा करुन माहिती घेवून सावेडी उपनगरात तात्काळ घंटा गाड्या सुरु करण्याचे आदेश देतो, असे स्पष्ट केले.

Recent Posts