अहमदनगर बातम्या

दुकानांना आग लागून मोठे नुकसान ; नगर शहरातील घटना

Ahmednagar News :नगर शहरातील बालिका आश्रम रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमधील दोन दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. हि घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

मनपाच्या अग्निशमन विभागाने हि आग आटोक्यात आणली, मात्र या घटनेत या दोन्ही दुकानातील सर्व साहित्य भस्मसात झाले.
याबाबत अधिक माहिती अशी नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील जाधव मळा परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने पत्र्याचे शेड उभारून त्यात अनेक गेले काढले आहेत.

याच गळ्यात अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. याच भागातील एक चपला व फॅब्रिकेशनच्या अशा दोन दुकानांना सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

एका दुकानात चपला असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धरण केले. त्यामुळे या भागात एकाच धावपळ उडाली. दरम्यान मनपाच्या अग्निशमन विभागास याबाबत माहिती समजताच तात्काळ दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठे प्रयत्न करत हि आग आटोक्यात आणली .

दरम्यान मनपाच्या अग्निशमन विभागाच्या वाहनास या भागात झालेल्या गर्दीमुळे घटनास्थळी पोहण्यास चांगलीच कसरत करावी लागली. मात्र यावेळी परिसरातील नागरिक व विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी वेळीच धावपळ करत हि आग विझवण्यास मदत केली.

नगर शहरात सध्या अनेक भागात पत्र्याचे शेड उभारून त्यात गाळे तयार केले जातात. हेच गाळे अनेक व्यावसायिकांना भाड्याने दिले जातात. अशा पत्र्याच्या गाळ्यांना यापूर्वी देखील आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र हे प्रकार सुरूच आहेत. आजच्या घटनेत देखील मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts