अहमदनगर बातम्या

अरे बापरे :’ या’ तालुक्यातुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण …?

Ahmednagar News:अज्ञात आरोपींनी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अज्ञात अपहरण केल्याच्या दोन धक्कादायक घटना पाथर्डीत घडल्या आहेत. या बाबत दोन वेगवेगळ्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

या घटनेमुळे शाळकरी मुले व पालक वर्गात प्रचंड भीती व दहशत निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील एका शाळेत गेलेली अल्पवयीन मुलगी दुपारी जेवनाच्या सुट्टीत घरी आली व परत शाळेत गेली त्या नंतर संध्याकाळी शाळा सुटली परंतु हि मुलगी घरी आली नाही.

त्यामुळे तिच्या पालकांनी मुलीच्या शिक्षकांना फोन करुन मुलीबाबत विचारपुस केली असता शिक्षकांनी सांगितले कि मुलगी शाळा सुटल्यावर घरी गेली परंतु ती घरी आली नसल्याने मुलीच्या पालकांनी व नातेवाईकांनी पाथर्डी शहरात व आजबाजूच्या गावात मुलीचा शोध घेतला मात्र मुलीचा शोध लागला नाही.

तर दुसऱ्या एका घटनेत शहरातील एक अल्पवयीन मुलगी याच वेळेला घरातून नातेवाईकांना काही एक न सांगता निघुन गेली. तिचा आजुबाजुला सर्वञ शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही म्हणून मुलीच्या पालकांनी व नातेवाईकांनी पाथर्डी शहरात व आजबाजूच्या गावात शोध घेतला मात्र मुलीचा शोध लागला नाही

म्हणून मुलीच्या पालकांनी अज्ञात आरोपी विरुद्ध मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान याबाबत पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पाथर्डी शहरातील जुने व नवीन बस स्थानक तसेच विविध ठिकाणी रस्त्यावर शाळा सुटण्याच्या व भरण्याचा वेळेला टवाळखोर खुलेआम रस्त्यावर शाळकरी मुलींची छेड काढत असतात.

यामुळे विध्यार्थिनीमध्ये या टवाळखोरांची दहशत आहे परंतु या अनुचित प्रकारा कडे पोलीस व शाळा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अनेक पालक मुलीना शाळेत पाठवायला धजावत नाहीत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office