‘हे’ आमदार म्हणतात ‘महापालिका हे आपले कुटुंब’

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- महापालिकेच्या माध्यमातून मला दोनदा महापौरपद मिळाले. त्या माध्यमातून नगरकरांची सेवेची संधी मिळाली.

या संधीच्या जोरावर नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारकीच्या पदावर विराजमान केले. याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. महापालिका ही आपल्या सर्वांची कुटुंब आहे.

असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. केडगाव प्रभाग समिती कार्यालयाच्यावतीने सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांचा सत्कार केला.

यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले आपण सर्वांनी मिळून नगर शहराच्या विकासाला चालना देऊ. केडगावच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. तुम्ही कोणालाही घाबरू नका, आपल्या कामाशी काम ठेवा व केडगावकरांचे प्रशन मार्गी लावा.

मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभा आहे. तुमचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम माझे आहे. महापालिका ही सेवा देणारी संस्था आहे. कामांच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याची सवय लावावी. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी.

आपल्या सर्वांना बरोबर घेऊन शहराचे विकासातून रुप बदलायचे आहे. पुढील दोन वर्षामध्ये विकसित नगर करणार आहे. यावेळी सभापती मनोज कोतकर म्हणाले की, माजी महापौर संदीप कोतकर यांनी केडगावच्या विकासाला चालना दिली.

त्यानंतर आ. संग्राम जगताप यांनी नेहमीच केडगाव विकासाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. केडगावकरांच्या सुख-दुःखाबरोबरच विकासकामांना प्राधान्य दिले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts