अहमदनगर बातम्या

I AM CHAPRI : इन्स्टाग्रामवर अहमदनगरमधील महिलेसोबत केले ‘असे’ काही

Ahmednagar News : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापराने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात क्रांती घडवून आणली आहे. इंटरनेटचा वापर जसजसा वैविध्यपूर्ण झाला आहे, तसतसे अनेक लोक संवादाचे, एकमेकांशी संवाद साधण्याचे साधन म्हणून इंटरनेटचा वापर करू लागले आहेत.

राजकारणी, अभिनेते आणि इतर नामांकित व्यक्ती देखील त्यांच्या प्रचार कार्याचा प्रचार करण्यासाठी आणि इंटरनेटवर अधिकाधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाटसअँप या सारख्या अन्य सोशल मिडियाचा वापर करतात. मात्र सध्या अनेकजण सोशल मीडियाचा गैरवापर करत एखाद्याची बदनामी करण्यासाठी या साधनांचा वापर करतात.

त्यामुळे सोशल मिडिया वापरताना प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. कारण नगरमध्ये एक तरुणाने इन्स्टाग्राम या सोशल मिडिया साईटवर एका महिलेच्या नावापुढे ‘आय अँम छपरी’ या नावाने बनावट आयडी तयार करून त्या महिलेची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सदर तरुणावर विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मिडिया वापरताना प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे.असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.विजय अनिल बोरडे (रा. मुकुंदनगर) असे त्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी बोरडे हा फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता तसेच तिचा चोरून पाठलाग करायचा. परंतु त्या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर तिला तिच्या नावापुढे ‘आय अँम छपरी’ नावाने इन्स्टाग्राम या सोशल मिडिया साईटवर कोणीतरी बनावट आयडी तयार करून त्यावर बदनामीकारक मजकूर टाकला असल्याची माहिती मिळाली.

तिने अधिक माहिती घेतल्यावर सदर बनावट आयडी आरोपी विजय अनिल बोरडे याने केला असल्याचा संशय आला. त्याच्या या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तिने मंगळवारी (दि.९) भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विजय अनिल बोरडे याच्या विरुद्ध इतर कलमांसह माहिती तंत्रज्ञानच्या कलमांसह प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सोशल मिडिया वापरताना प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts