अहमदनगर बातम्या

खबरदार माझ्या बापाबद्दल बोललात तर….. आता शिर्डीत लक्ष घालून तिथं पण जिंकणार; जयश्री थोरात यांचा सुजय विखेंना इशारा

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ म्हटला म्हणजे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो. अहिल्या नगर जिल्ह्याचे जर आपण राजकारण बघितले तर ते थोरात आणि विखे यांच्या भोवती फिरताना आपल्याला प्रामुख्याने दिसून येते व या दोघांना अहिल्यानगर जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक देखील समजले जाते.

थोरात आणि विखे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र हे राजकारणातील कटूता राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या ऐवजी त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये रूपांतरित झाल्याचे दिसून येत आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र  डॉ. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती व त्यामुळे थोरात आणि विखे कुटुंबामध्ये अनेकदा शाब्दिक चकमक रंगताना आपण पाहिली. परंतु आता अशाच पद्धतीची शाब्दिक चकमक सुजय विखे आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यात रंगल्याचे दिसून येत आहे.

 सुजय विखेंच्यायाआरोपाला जयश्री थोरात यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

भाजपचे माजी खासदार तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप करताना म्हटले की, थोरातांनी घरातच पद वाटले. या त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना जयश्री थोरात यांनी म्हटले की, त्यांचा आरोप बरोबर आहे.

थोरात साहेबांनी जे केले ते बरोबरच केले. थोरात साहेबांचा परिवार कमी नाही. यांचा परिवार तब्बल सात लाख लोकांचा परिवार आहे. संपूर्ण संगमनेर तालुका हा थोरात साहेबांचा परिवार आहे.

त्यामुळे संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी बघायचं नाही. तुमची जागा काय आहे हे तुम्हाला दाखवल्याशिवाय संगमनेर तालुका स्वस्थ बसणार नाही.

अडीच वर्षापासून राज्यात जे काही खोके सरकार बनले आहे तेव्हापासून जो काही त्रास सुरू केला आहे. परंतु थोरात साहेब सर्वात जास्त काळ महसूल मंत्री राहिले असून त्यांनी कोणाला टाचेखाली चिरडलं नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे असे देखील जयश्री थोरात यांनी म्हटले.

 माझा बाप हा माझा एकटीचा नाहीतर सात लाख लोकांचा बाप आहे: जयश्री थोरात

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,थोरात साहेब संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान असून खबरदार माझ्या बापाविषयी बोलले तुम्ही, हा बाप माझा एकटीचा नसून तो संगमनेर मध्ये असलेल्या सात लाख लोकांचा बाप आहे.

ज्यांना स्वतः घर सांभाळता येत नाही ते काय दुसऱ्याला सांभाळणार. स्वतःच्या संस्था कर्जात बुडालेल्या असून बाबळेश्वर दूध संघ त्यांनी बंद पाडला व गणेश कारखाना आठ वर्षे बंद ठेवला तसेच राहुरी कारखान्याचे त्यांनी काय केले? असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला.

 जयश्री थोरात यांनी शिर्डीबाबत दिला सूचक इशारा

अभ्यास कच्चा असलेल्या लोकांना समृद्ध असा संगमनेर तालुका कसा झेपणार? असा प्रश्न करत त्यांनी म्हटले की, त्यांचा तालुका बघा, गेल्या पन्नास वर्षापासून त्यांच्या हातात आहे.

त्यांच्या तालुक्याची काय परिस्थिती करून ठेवली आहे ते आधी बघा. त्यामुळे आता आपल्याला विचार करावा लागेल व शिर्डी विधानसभा मतदारसंघात आपलाच आमदार हवा आहे.

साहेबांना मानेल असाच आमदार आपल्याला तिथं हवा आहे असे सांगून शिर्डी विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचा सुचक इशारा देखील जयश्री थोरात यांनी या निमित्ताने दिला.

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts