Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल ते घोडेगाव येथे मटका, जुगार, गाड्यांमधून स्टिल लुट, अवैध दारू, देहविक्री व्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे.
त्यावर कारवाई करण्याऐवजी बीट प्रमुखांनी येथील सर्व अवैध व्यवसायाला परवाना दिला कि काय, असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.
अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल, घोडेगाव येथे अनेक गुन्हे घडत असतात. मात्र याबाबत कुठलीच ठोस भूमिका व कारवाई होत नसल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र या परिसरात आहे.
अवैध व्यवसाय, चोऱ्या, असे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. परिसरात मटका, जुगार, गाड्यांमधून स्टिल लुट, अवैध दारू, अवैध प्रवासी वाहतूक, यासह ढाब्यावरील देहविक्री व्यवसाय पुन्हा फोफावला असताना पोलीस खरेच कायदा सुव्यवस्था राखतात का? यावर नागरिकांची चर्चा सुरू आहे.
महामार्गावरील या गावात विविध लहान मोठे व्यवसाय आहेत. बाहेरगावातून येणाऱ्या नागरिकांची येथे नेहमीच रेलचेल असते हे सर्व अवैध धंदे पोलिसांनी चिरीमिरी घेऊन सुरू आहे.