अहमदनगर बातम्या

श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत अवैध धंदे जोमात; कायदा सुव्यवस्था धोक्यात

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत बर्‍यापैकी अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसत असताना पोलिसांची खमकी कारवाई होताना अजून तरी जनतेला दिसले नाही.

शहरात अवैध व्यवसायाचे केंद्र तयार होत असताना काष्टी ,बेलवंडी ,मांडवगण आदी मोठ्या गावच्या हद्दीत अवैध व्यवसायांनी जोम धरला आहे.

मात्र पोलिसांकडून कारवाया होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. तालुक्याील बागायती क्षेत्र वाढत असल्याने रोजगाराच्या संधी कमी असताना तालुक्यातील अवैध व्यवसाय मात्र तेजीत आल्याचे दिसत आहे.

कल्याण ,मुंबई ,रनिंग मटका राजरोसपणे सुरू असल्याने अनेकजण या मटका खेळण्याच्या नादाला लागले आहे. अवैध व्यवसायात दारू, जुगार, हातभट्टी याचबरोबर खुलेआम सुरू असलेल्या कल्याण,

मुंबई, मटका असे अनेक व्यवसाय तालुक्यातील अनेक भागात सुरू असून श्रीगोंदा आणि बेलवंडी असे दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत तालुक्यातील 114 गावे विभागून आहेत.

बुकी चालकांनी आपले कमिशन वर नेमलेले एजंट गावागावांत आपला धंदा गोळा करत आहेत.याचा परिणाम थेट मटका खेळणार्‍यांची संख्या वाढत आहे.

मटका खेळून लखपती होण्याच्या नादात बुकी व मटकाचालक कोट्यधीश झाले आहेत. काही रुपयांपासून लाख लाख रुपयाचा खेळ खेळताना अनेकजण कर्जबाजारी झाले.

यामुळे पोलिसांनी तातडीने या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत हा अवैधधंदा बाबद करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे. आता यावे कारवाई होणार कि नाही याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts