अहमदनगर बातम्या

Sangamner News : घरपट्टीमध्ये केलेली दरवाढ तातडीने रद्द करा, आमदार थोरातांची सरकारकडे मागणी

Sangamner News : संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात १० टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. सदरची दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही.

केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे वाढीव दरवाढ स्थगित होऊन शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.

नागपूर येथे अधिवेशनात आमदार बाळासाहेब थोरात यांनी ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. संगमनेर नगरपरिषद हद्दीत संकलित कर आकारणीबाबत चतुर्थ वार्षिक रिविजन पूर्ण झाली असून सन २०२३-२४ या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहेत. यात शहरातील घरांच्या संकलित करात दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली आहे.

सदरची दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक असून महागाई बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणार नाही, असे आमदार थोरात यांनी यावेळी सांगितले. केलेली दरवाढ तातडीने रद्द करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

आमदार सत्यजित तांबे यांनीही या कामी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून संगमनेर मधील नागरिकांना ही दहा टक्के प्रास्तावित दरवाढ परवडणारी नसून आर्थिक कुचंबना करणारी आहे. त्यामुळे त्वरित दरवाढ रद्द झाली पाहिजे, यासाठी प्रशासन दरबारी पाठपुरावा केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts