अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी ! १० हजारापासून ते १ लाखापर्यंत…

Ahmednagar News: राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत १५ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर, २०२२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत या तालुक्यांमध्ये ही यात्रा संपन्न झाली आहे. उर्वरित ११ तालुक्यांमध्ये २७ ऑगस्ट २०२२ पासून ही यात्रा सुरू होणार आहे.

उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या राज्यातील १३४ युवक-युवतींना रुपये १० हजारापासून ते १ लाखापर्यंतचे पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून या यात्रेत सहभागी व्हावे.

असे आवाहन अहमदनगर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

अहमदनगर जिल्हयातील युवकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन २७ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर, २०२२ या कालावधीमध्ये तालुका स्तरावर करण्यात आले आहे.

यामध्ये युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे २७ ऑगस्ट रोजी, जामखेड,

संगमनेर, कोपरगाव, राहाता व राहूरी येथे २९ ऑगस्ट रोजी, पाथर्डी ,श्रीरामपूर व नेवासा येथे ३० ऑगस्ट रोजी , अहमदनगर व शेवगाव येथे १ सप्टेंबर २०२२ रोजी ही यात्रा काढली जाणार आहे.

अहमदनगर जिल्हयातील सर्व विद्यार्थी व नवउद्योजकांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या वेबसाईटवर नोंदणी करुन सूवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts