अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिर्डी व कोपरगावच्या दौऱ्यावर होते. आपल्या खास शैलीत त्यांनी राज ठाकरेंना सुनावलं तसेच मताधिक्याच्या मुद्द्यावरून कोपरगावच्या मतदारांनाही आहान दिलं.
शिर्डीच्या कार्यक्रमात त्यांच्या कानात काही तरी सांगू पाहणारे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना त्यांनी चार वेळा हात जोडून नकार दिला.
शिर्डीत पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीचं उद्घाटन तर कोपगावमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
राष्ट्रवादीचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबतच भाजपचे खासदार डॉ. विखे आणि शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हाही कार्यक्रमाला उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील आजनसंबंधीच्या भोंग्याच्या मुद्यावरू सध्या चर्चा सुरू आहे. त्यावर ठाकरे यांचं नाव न घेता पवारांनी टीका केली.
“अलीकडे कुणी तरी बाहेर येतो आणि भोंगे बंद करा म्हणतो. त्यांना हे आताच का सूचलं? यापूर्वी सरकारमध्ये त्यांचं कोणी नव्हतं का? तेव्हा झोपले होते का? आरं बाबा बोलणं सोपंय, पण आपण काय सांगतोय, त्याचे काय परिणाम होतील, हे पण पाहिलं पाहिजे ना,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना फटकारले.
आम्ही कामं करतो तुम्ही मतं द्या, असा सांगत ते म्हणाले, “आम्ही काही साधू-संत नाही, माणसंच आहोत. आम्ही कामं करतो, तुम्ही मताधिक्य द्या. घोडा मैदान जवळच आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसेलच तुम्ही काय करता ते. आम्ही मात्र शब्दाचे पक्के आहोत. आता सांगितलेली कामं नाही केली, तर पवारांची औलाद सांगणार नाही,’ असं पवार म्हणाले.
शिर्डीच्या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं भाषण सुरु असताना डॉ. विखे पाटील आपल्या खुर्चीवरुन उठून दोन चारखुर्च्यांपलीकडं बसलेल्या अजित पवार यांच्या पाठीमागं जाऊन त्यांच्या कानात काही तरी सांगू लागले.
मात्र अजित पवार यांनी नको नको म्हणत जोडत होते. असे दृष्य पहायला मिळालं. त्याची आता चर्चा सुरू झाली आहे.