निमगाव वाघात निवडणुकीतील सर्वच उमेदवार आले एका छताखाली

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार वळणावर आल्या असताना, विरोधकांवर आरोप-प्रत्यारोपाची फैरी झाडल्या जात आहे.

गावाच्या निवडणुकीत कोणाचा पॅनल किंगमेकर ठरणार यासाठी एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडली जात नाही.

या निवडणुकीच्या रणशिंगात गावा-गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना निमगाव वाघा (ता. नगर) येथे निवडणुकीतील सर्वच उमेदवार एका छताखाली येण्याचा सुखद धक्का ग्रामस्थांना मिळाला. निवडणुका लोकशाही व निकोप पद्धतीने पार पाडाव्या म्हणून एकता फाऊंडेशन ट्रस्टने सर्वच उमेदवारांना एका छताखाली एका व्यासपिठावर ग्रामस्थांसमोर आनण्याचे कार्य केले.

राजकीय हेवेदावे व स्पर्धा बाजूला सारत नवनाथाच्या मंदिर सभागृहात सर्व उमेदवार एकत्र जमले होते. सर्व उमेदवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत गावाच्या विकासासाठी कार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके म्हणाले की, गावाच्या निवडणुकीत गटतटाच्या राजकारणात वादाच्या ठिंणग्या पडून एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होत असतात.

निवडणुकीचे भांडणे वर्षानुवर्षे चालतात. हे वाद विकोपाला जाऊन गावाची शांतता भंग होते. गुण्या-गोविंदाने राहणार्‍या गावात या निवडणुकीपायी भांडणे होऊ नये, वाद विकोपाला न जाता ही लोकशाही प्रक्रिया निकोपपणे पार पाडण्यासाठी हा उपक्रम घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार एकनाथ जाधव, किरण जाधव, भाऊसाहेब जाधव, मनोजकुमार फलके, संदीप फलके, उज्वला कापसे, सविता कापसे, सुजाता कापसे, लक्ष्मी जाधव, नाना डोंगरे, राजेंद्र डोंगरे, जमीर शेख, प्रतिभा गजरे, रुपाली जाधव, संगीता डोंगरे,

यमुना चौरे, लता फलके, विजय केदार, दिपक गायकवाड, अश्‍विनी कदम, संगीता आतकर, छबाबाई पुंड, मुन्नाबी शेख भास्कर उधार, अर्जुन काळे, प्रमोद जाधव, संदेश शिंदे, संजय कापसे, सुमन डोंगरे, अन्सार शेख, अलका गायकवाड, मनिषा गायकवाड, विद्या गायकवाड यांचा एकता फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण अंधारे, रामदास पवार, किरण जाधव, सागर फलके, राहुल फलके, महेश फलके, अक्षय ठाणगे, रितेश डोंगरे, हुसेन शेख, सुधीर खळदकर, विकास जाधव, रविंद्र जाधव, शिरीष फलके, सोमनाथ फलके, पंकज वाबळे आदी एकता फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास अडसूरे यांनी केले. आभार संतोष फलके यांनी मानले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts