अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- संगमनेर शहरालगतच्या समनापुर परिसरात गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीयांकडून वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या वाहनांची बेकायदेशीर कटिंग करून सुट्या भागांची खुलेआम विक्री केली जात आहे. (Sangamaner crime)
या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून या प्रकाराकडे आरटीओ सह पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
तालुक्यातील समनापूर परिसरात उत्तर प्रदेशातील आणि बिहार राज्यातील परप्रांतीय गुन्हेगारी टोळ्यांचे साम्राज्य वाढले आहे.
याठिकाणी महाराष्ट्र राज्यामधून सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांची सर्रास दिवसरात्र गॅस सिलेंडरच्या सहाय्याने कटींग करून वाहनांच्या वेगवेगळ्या सुट्या भागांची विक्री राजरोसपणे चालू आहे.
या व्यवसायामधून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. दरम्यान कोणतेही वाहन स्क्रॅप करण्याआधी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची परवानगी घेणे,
तसेच त्या वाहनांचा रितसर सर्व कर भरल्यानंतर नॉनयुज सर्टिफिकेट दाखला घेऊनच स्क्रॅप करणे व त्या स्क्रॅप मटेरीयलची विल्हेवाट लावणे कायद्याने बंधनकारक आहे.
मात्र समनापूर परिसरात शासनाची किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता उत्तर प्रदेश बिहार या राज्यातून समनापूर येथे स्थाईक झालेल्या काही व्यक्तींकडून वाहनाची खुलेआम कटिंग केली जात आहे.
स्क्रॅप केली जाणारी अनेक वाहने फायनन्स कंपनीची असतात. अनेक वाहनांवरती बँकेची थकबाकी असते. काही वाहने ही चोरीची विना कागदपत्रे असल्याने आणि शासन प्रशासनाचा धाक नसल्याने ही सराईत गुन्हेगारी सर्रास चालू आहे.
गेल्या काही व्यवसायातून वर्षांपासून समनापूर परिसरात हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.