अहमदनगर बातम्या

शिर्डीत काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष्यांनी पदाचा राजीनामा देत अपक्ष अर्ज दाखल केला

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नुकतेच शिर्डीमधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिर्डीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष असलेले सुरेश आरणे यांनी पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिर्डीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्यातील नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा द्या, अशी मागणी या सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने नगरपरिषदेसाठी नुकतीच अधिसूचना जारी केली आहे.

मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 7 डिसेंबर रोजी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश आरणे यांनी पदाचा राजीनामा देत पोलीस संरक्षणात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सुरेश आरणे यांनी प्रभाग क्रमांक 11 (अनुसूचित जाती) मधून तर त्यांची पत्नी अनिता आरणे यांनी प्रभाग क्रमांक 1 (सर्वसाधारण महिला) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आरणे यांच्यासह आणखी काही जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिर्डीत मोठी राजकीय घडामोड घडल्याने शिर्डीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts