Ahilyanagar News:- राज्यातील अहिल्या नगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहेच.परंतु सहकाराची परंपरा व सहकाराची भूमी असलेला जिल्हा म्हटला तरी वावगे ठरणार नाही. राजकीय दृष्ट्या देखील अहिल्यानगर जिल्हा हा संपूर्ण राज्यात महत्त्वाचा असून या जिल्ह्याच्या राजकारणाचा खूप मोठा प्रभाव हा संपूर्ण राज्याच्या राजकारणावर असतो.
सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये जर आपण आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर 1951 ते 2019 कालावधीमध्ये 15 विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत.
या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने अनेक राजकीय उलथापालथ आणि राजकीय डावपेच खूप जवळून पाहिलेले आहेत. या 15 विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत जर आपण विधानसभेतील महिला प्रतिनिधित्वाच्या दृष्टिकोनातून जर या जिल्ह्याचा विचार केला तर मात्र ते तितकेसे समाधानकारक नाही.
या जिल्ह्यातून आतापर्यंत झालेल्या 15 विधानसभा निवडणुकांमध्ये 36 महिलांनी विधानसभा निवडणूक लढवली. परंतु या 36 महिलांपैकी आतापर्यंत फक्त दोनच महिलांना विधानसभेपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले व या दोन महिला म्हणजे भाजपच्या स्नेहलता कोल्हे व मोनिका राजळे या होय.
अहिल्या नगर जिल्ह्यातून आतापर्यंत 36 महिलांनी लढवली विधानसभा परंतु सभागृहात पोहोचल्या फक्त दोन
1951 ते 2019 या कालावधीत एकूण 15 विधानसभा निवडणुका पार पडल्या व अहिल्यानगर जिल्ह्यातून या विधानसभा निवडणुकांमध्ये 36 महिलांनी आपले नशीब आजमावले. परंतु या 36 महिलांमधून फक्त आतापर्यंत या जिल्ह्यातून स्नेहलता कोल्हे व मोनिका राजळे या दोन महिलांनाच सभागृहापर्यंत पोहोचण्यामध्ये यश आले.
या दोघींची जर आपण कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर या दोघीजणींना राजकीय वारसा लाभलेला आहे. 1951 मध्ये जी विधानसभा निवडणूक झाली होती त्यामध्ये हिराबाई भापकर या किसान पक्षाकडून उमेदवार होत्या. या झालेल्या निवडणुकीमध्ये विठ्ठल कुटे हे राष्ट्रीय काँग्रेस कडून निवडून आलेले होते.
त्यानंतर 1957 मध्ये कमला रानडे या अपक्ष रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसचे त्रिंबक भारदे निवडून आलेले होते. 1962 मध्ये कर्जत मतदारसंघातून हिराबाई प्रभाकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तसेच 1972 मध्ये अहमदनगर दक्षिण मधून रानडे यांनी निवडणूक लढवली पण त्यांना देखील यश आले नाही.
याच वर्षी माणिक बाई गरजे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली परंतु त्यांचा देखील अपक्ष उमेदवार गणपत मस्के यांनी पराभव केला. त्यानंतर 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत विधानसभा मतदारसंघातून रंजना पाटील हे जनता पक्षाकडून रणांगणात होते व संगमनेर मधून शकुंतला थोरात यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
परंतु या निवडणुकीत दोन्ही जणींना पराभव पत्करावा लागला. यावेळी अपक्ष उमेदवार बाळासाहेब थोरात संगमनेर मधून निवडून आले होते. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत मधून परत एकदा रंजना पाटील या रिंगणात होत्या व त्यावेळी देखील भाजपच्या सदाशिव लोखंडे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.
1995 च्या विधानसभा निवडणुकीत शेवगाव मधून अपक्ष झुंबर बाई थोरात आणि कोपरगाव मधून जाईबाई शेजवळ या अपक्ष म्हणून उमेदवारी करत होत्या. परंतु त्यांना देखील अपयश आले. 1999 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सुमनबाई पठारे या अपक्ष उभ्या होत्या व याच निवडणुकीत कोपरगाव मधून संगीता पंढरीनाथ शिंदे व राहुरीतून लता जाधव,
पारनेर मधून शकुंतला खैरे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली व यासगळ्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. 2004 मध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून प्रभावती पवार या अपक्ष निवडणूक लढवत होत्या तर पारनेर मधून शकुंतला खैरे हे देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात होत्या व यावेळी देखील या दोन्ही महिलांचा पराभव झाला.
नंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर मधून निशाताई शिवरकर व सुमन पांडे तर कोपरगाव मधून नंदा जाधव, श्रीरामपूर मधून छाया सरोदे, रंजना पाटील, नेवासा विधानसभा मतदारसंघातून उषाताई उन्हवणे, शेवगाव मधून हर्षदा काकडे आणि पारनेर मधून सुजाता ठुबे विधानसभेच्या रिंगणात होत्या व त्यापैकी एकही महिला जिंकू शकली नाही.
स्नेहलता कोल्हे आणि मोनिका राजळे ठरल्या पहिल्या महिला आमदार
त्यानंतर मात्र 2014 मध्ये संगमनेरातून सुनीता बेल्हेकर, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर स्नेहलता कोल्हे व शेवगाव मधून मोनिका राजळे, श्रीरामपूर मधून सुनीता गायकवाड तर राहुरीतून डॉ.उषा तनपुरे, श्रीगोंद्यातून रत्नमाला ठुबे निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
परंतु या सगळ्या महिला उमेदवारांपैकी स्नेहलता कोल्हे व मोनिका राजळे यांनी पहिल्यांदा यश मिळवले व अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथमच विधानसभेमध्ये या दोन महिला पोहोचल्या. परंतु यामध्ये मोनिका राजळे या दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचवणाऱ्या महिला ठरल्या आहेत.