Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात विविध प्रकल्पांचे कामे सुरू आहेत. विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुधारित केली जात आहे.
पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये लोकलचा मार्ग विस्तारला जात आहे. याशिवाय इतरही अन्य शहरांमध्ये वेगवेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे चालू वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे.
चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत शिवाय राज्यात विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करून सर्वसामान्यांना त्या प्रकल्पांचा लाभ घेता यावा यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील प्रकल्पांना देखील गती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याची क्षमता ठेवणारी अमृत योजनेचे काम या चालू वर्षात पूर्ण होणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना रोजच पाणी उपलब्ध होणार आहे.
नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने निश्चितच हे वर्ष नगरकरांसाठी विशेष आनंदाचे राहील यात शंकाच नाही. याशिवाय नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला देखील या चालू वर्षात गती देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
याशिवाय इतरही अन्य महत्त्वाचे प्रकल्प या चालू वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. दरम्यान, आता आपण या प्रकल्पांबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
40 किलोमीटरच्या बायपासचे काम पूर्ण
शहरातील विकासाला हातभार लावणारा नगर बायपास या चालू वर्षात सुरू होणार आहे. हा अहमदनगरच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
जवळपास ७०० कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या ४० किमी अंतराच्या नगर बायपासचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे नगर-मनमाड, छत्रपती संभाजीनगर- पुणे, नगर-सोलापूर, नगर-दौंड व विशाखापट्टणम-कल्याण या पाच महामार्गावरून जाणारी वाहतूक नगर बायपासने जाणार आहे.
यामुळे अहमदनगर शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येणार असा आशावाद व्यक्त होत आहे. हा प्रकल्प 26 जानेवारी 2024 ला सुरू होऊ शकतो अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
अहमदनगरकरांचा पाणी प्रश्न निकाली निघणार
मिळालेल्या माहितीनुसार, नगर बायपाससोबतच अहमदनगर शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा अमृत योजनेचे देखील काम या चालू वर्षात पूर्णत्वास येणार आहे. नगरकरांना दररोज पाणी मिळावे, यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून मुळानगर येथे रॉ वॉटर रायझिंग मेन, जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण, नवीन पाण्याची टाकी, मुळानगर येथे बॅलसिंग प्रेशर टैंक बांधण्यात आले आहे.
या प्रकल्पाचे काम जवळपास सहा वर्षांपासून सुरू असून या चालू वर्षात या प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण होणार आहे. यामुळे शहरातील पाणी प्रश्न निकाल असा दावा होत आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 1.37 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
शहरात आठ लाख स्मार्ट मीटर
अहमदनगर शहरात या चालू वर्षात आठ लाख स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. यामुळे वीजगळतीला आळा बसणार असा आशावाद व्यक्त होत आहे. यामुळे ग्राहकांना वाढीव वीज बिल देखील मिळणार नाही असे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितले जात आहे.
नगर बीड परळी रेल्वे मार्गाला मिळणार गती
अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि मराठवाड्यासाठी अति महत्त्वाच्या अशा नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला या चालू वर्षात गती मिळणार आहे. नगर-मनमाड रेल्वे मार्गचे दुहेरीकरण होणार आहे. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य असा वेळ वाचणार आहे.
वर्ष 2024 मध्ये अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या ९५ किमी अंतराच्या कामाला गती मिळेल, असे बोलले जात आहे. या रेल्वेमार्गासाठी १८ हजार हेक्टर भूसंपादन केले आहे. नगर ते मनमाड रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचे काम सुरू आहे.
त्यामुळे क्रॉसिंगचा वेळही वाचणार अशी आशा तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.