अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहर युवक काँग्रेस मध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वखाली काम करण्यासाठी नगर शहरातील तरुणांनी आता युवक काँग्रेसची साथ धरली आहे ,
युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या माध्यमातून युवकचे जिल्हा अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या हस्ते तरुणांचे युवक काँग्रेस मध्ये प्रवेश घेण्यात आले आहे,
शंकर जगताप, आकाश साळवे, आशिष भैय्या गुंदेजा आदींनी आपल्या समर्थकंसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला , यावेळी अंकुश पाटील शेळके, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप पुंड, देवेंद्र कडू, अमन तिवारी, गणेश भोसले,
सुजय गांधी, योगेश धाडगे आदी उपस्थित होते , सत्यजित दादा तांबे यांच्या प्रेरणेने मयूर पाटोळे यांच्या खांद्याला खांदा लावून युवक काँग्रेसची धुरा नगर शहरात उंचवू असे आश्वासन प्रवेश कर्त्यानी यावेळी दिले
व वरिष्ठांच्या मान्यतेने लवकरच युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत ह्या तरुणांना चांगली संधी देऊ असे आश्वासन मयूर पाटोळे यांनी दिले.