अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे आणि खासदार राजीव सातव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
‘महाजॉब्सच्या जाहिरातीत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे फोटो असणे गरजेचे आहे. सरकारचा भाग म्हणून सत्यजित यांनी ट्वीट केले असेल.
मात्र उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे, असं बाळासाहेब थोरात सांगितलंय.
मुख्यमंत्री आणि आमच्यात संवाद वाढला पाहिजे. गेले काही दिवस कोरोना काळात हा संवाद कमी झाला होता. मागील आठवड्यात भेटलो होतो. काही विषयावर चर्चाही झाली, अशी माहितीही थोरात यांनी दिलीय.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews