अहमदनगर बातम्या

कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याचे सिंचन रविवारपासून सुरू होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याचे सिंचन रविवारपासून सुरू होणार आहे. तर गोदावरी उजव्या कालव्याचे रब्बीचे पहिले सिंचन आवर्तन सुरू झाले आहे. या आवर्तनासाठी दारणातून 500 क्युसेकने पाणी काढण्यात आले आहे.(Kopargaon news)

गोदावरीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या रविवार पासून सुरू होऊ शकते. 14 किमी अंतरावरील निफाड च्या रुई भागात एका कल्व्हर्टची भिंत तुटल्याने हे आवर्तन सुरु नव्हते.

त्या भिंतीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या रविवारी सायंकाळी कोपरगाव च्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याला आवर्तन सोडले जाणार आहे.

दरम्यान 2 डिसेंबरला धरणांच्या पाणलोटात तसेच लाभक्षेत्रात हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता. धरणांचे रिकामे झालेले साठे यामुळे पुर्वस्थितीत आले होते.

अशातच बिगरसिंचनासाठी जलसंपदा विभागाने उजव्या कालव्याला 3 डिसेंबरपासून पाणी सोडले होते. या पाण्यात सर्वच पिण्याच्या पाण्याचे तलाव भरुन जलसंपदाने 4-5 दिवसांपासून सिंचन सुरु केले आहे.

गोदावरी उजव्या कालव्यावर 1410 हेक्टर क्षेत्राला मागणी होती. परंतु काही शेतकर्‍यांनी पाणी या आवर्तनातील पाणी घेतले नाही. त्यामुळे हे आवर्तन लवकर पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

चितळी, वाकडी भागातील सिंचन करुन अस्तगाव, राहाताचे सिंचन सुरु आहे. लवकरच पाणी वर वर जाईल. त्यामुळे या आवर्तनातील पाणी काही प्रमाणात शिल्लक राहुन उन्हाळी हंगामासाठी याची मदत होवु शकते. या आवर्तनासाठी दारणातून पाणी काढण्यात आले आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts