अहमदनगर बातम्या

लाडक्या बालकाचा छंद पुरवण्याची जबाबदारी पालकाची असते, आ. बाळासाहेब थोरातांची विखेंना कोपरखिळी !

आपण कधीही चुकीचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाने विकासाचे राजकारण केले, म्हणून जनता सातत्याने आपल्यासोबत आहे. त्यांचे दहशतीचे अन् जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नाही.

दहशतीचे राजकारण आता जनता सहन करणार नाही, असे सांगत माजी मंत्री आमदार बाळासाहेव थोरात यांनी नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात तोफ डागली. डॉ. सुजय विखे यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून लढण्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना, लाडक्या बालकाचा छंद पुरवण्याची जबाबदारी पालकाची असते. त्यांनी आपल्या लाडक्या बालकाचा छंद पूर्ण करावा, अशी कोपरखिळीही हाणली.

आश्वी बुद्रक येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, व्यासपीठावर अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन स्पाकर जोशी, ड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे,

डॉ. जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड, डॉ. राजेंद्र पिपाडा, गणपतराव सांगळे, गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, ड. नारायणराव कार्ले, राजेंद्र चकोर, ड. नानासाहेब शिंदे, विजय हिंगे, सुमतीलाल गांधी, नवनाथ महाराज आंधळे, सुरेश थोरात, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच अरुणा हिंगे, गीताराम गायकवाड, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, अशोक सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, दहशत व दडपशाही असतानाही आश्वी व परिसराने २५ वर्ष सातत्याने मोठे मताधिक्य दिले. आपण विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांची ही कामे केली. मागील अडीच वर्षाच्या काळात या परिसरातील अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. त्यासाठी पाठपुरावा केला, सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाचे व विकासाचे राजकारण केले ही आपली परंपरा आहे.

मात्र, याउलट या परिसरामध्ये मोठी दहशत आहे. विरोधी गावचा सरपंच असेल, तर अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष या लोकांनी पेरुन ठेवले आहे. जिरवाजिरवी आणि दमदाटघाचे राजकारण फार काळ चालत नाही. १० वर्षे गणेश साखर कारखाना तुमच्या ताब्यात असताना चांगला चालवता नाही. आमची भावना आणि उद्देश चांगला म्हणून गणेश कारखाना अत्यंत चांगला चालला.

मात्र, त्यातही अनेक अडचणी आणण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. गोरगरिबांच्या प्रपंचाशी खेळू नका, सत्तेचा गर्व जनतेने उतरवला आहे. संगमनेरप्रमाणे राहाता आणि शिर्डीमध्येही चांगले वातावरण निर्माण करू, असेही ते म्हणाले. प्रभावतीताई घोगरे म्हणाल्या , संगमनेरमध्ये अत्यंत शांततेचे, संस्कृतपणाचे आणि विकासाचे राजकारण आहे. मात्र, राहाता तालुक्यामध्ये दडपशाही आणि हुकुमशाही आहे. हम करे सो कायदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील नेत्यांनी गोरगरिबांना देवच आठवायला लावला आहे, पण आता दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. राजेंद्र पिपाड़ा म्हणाले की, राहाता तालुक्यामध्ये विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी यासारख्या खोटया केसेस दाखल केल्या जात आहेत. अत्यंत दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. या हुकूमशाहीच्या राजकारणामुळे राहाता तालुका संपूर्णपणे अस्वस्थ असून, आपण भाजप वरिष्ठांकडेही येथील नेतृत्वाची तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमासाठी बँकेचे संचालक किसन सुपेकर, संजय थोरात, राजेंद्र काजळे, लक्ष्मण खेमनर, शिवाजी जगताप, श्रीकांत गिरी, अविनाश सोनवणे, बाबुराव गुंजाळ, किसनराव वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, ललिता दिघे, कमल मंडलिक, कचरू फड, ब्रिजमोहन बिहानी, बाबुराव जराड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी, तर व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts