भरदिवसा पुन्हा एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दि.1 फेब्रुवारी रोजी घडली आहे. दरम्यान हा खळबळजनक प्रकार राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे घडला आहे.

राहुरी पोलिसांत अज्ञात इसमा विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दोनच दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीचे राहुरी फॅक्टरीहून रिक्षातून अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही घटना घडल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

सतरा वय वर्ष असलेली हि मुलगी गुंजाळे येथे आपल्या कुटुंबाबरोबर राहते. दि. 1 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजे दरम्यान अज्ञात इसमाने त्या मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुशांत दिवटे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts