Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटमध्ये करोडो रुपयांची माया गोळा करून अनेकजण पसार झालेले आहेत. यात जास्त परताव्याच्या अमिषाला बळी पडून अनेकांचे होत्याचे न्हवते झाले आहे. मात्र आता यामुळे अनेकजण आपले पैसे परत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार काळ घडला असून शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या पैशावरूनच तिघा तरुणात वाद झाला असून त्याचे पर्यावसान मारामारीमध्ये झाले अन यात दोघा तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करुन त्यांना जखमी करण्यात आले आहे.
ही घटना पाथर्डी शहरातील एका हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश बाळासाहेब काटे (रा. आखेगाव, ता. शेवगाव) याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २७ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमध्ये अमोल रेवडकर व आशिष खांबट (दोघे रा. बरूर, ता. शेवगाव) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अमोल रेवडकर व आशिष खांबट हे शेवगावच्या वरुर येथील राहणारे आहेत. तर महेश बाळासाहेब काटे यांच्या ओळखीचे आहेत. तिघेजण पाथर्डीत एका हॉटेल समोर उभे होते. यांच्यामध्ये बोलताना पैशावरुन वाद झाला.
महेश काटे याने एक लाख रुपये रेवडकर व खांबट यांना मागितले. पैसे देत नाही, याचा राग धरुन महेश काटे याने खिशातुन काहीतरी धारदार काढले व त्याच शस्त्राने या दोघांवर सपासप वार केले. रेवडकर व खांबट यांनी काटेचा पाठलाग देखील केला. मात्र कोणाला काही समजायच्या आतमध्ये काटे हा पसार झाला. मात्र जमावातील काहींनी महेश काटे याला पकडले.
पोलिसही घटनास्थळी तातडीने आले. राहुल खांबट याने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. जखमी झालेल्या खंबाट व रेवाडकर यांच्यावर शहरातील उपजिल्हा रुग्नालयात प्राथमिक उपचार केले. मात्र अमोल रेवटकर याच्या मानेवरील वार अतिशय गंभीर असल्याने त्याला व खांबट याला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी अमोल रेवटकर याची प्रकृती अधिक गंभीर आहे.