Ahmednagar News : साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त विजयादशमीला आयोजित उत्सवासाठी शिर्डीत लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. विजयादशमीला उत्सवाच्या मुख्य दिवशी साईंच्या दरबारात भक्तांची मांदियाळी जमली होती. दर्शनासाठी मंदिर रात्रभर उघडे असल्याने जगभरातून आलेल्या साईभक्तांनी साईंच्या दर्शनाचा लाभ घेतला.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या १०५व्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी काल रात्रभर उघडे होते. याचा साईभक्तांनी लाभ घेतला. मंदिर परिसरात मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व श्री राम मंदिर हा भव्य देखावा व हैद्राबाद येथील दानशूर साईभक्त रेणुका चौधरी यांच्या देणगीतून करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट साईभक्तांसाठी लक्षवेधी ठरली. उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली.
पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांच् या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगडा यांनी पोथी, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी विणा,
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी मालती वार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, संरक्षण अधिकारी आप- णासाहेब परदेशी, मंदिरप्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुपार शेळके, पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ७ वाजता न्यायाधीश सुधाकर यालंगडा व त्यांच्या पत्नी मालती यालंगड्डा यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपूजा करण्यात आली. सकाळी ९ वाजता शिर्डी शहरातून काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात न्यायाधीश बालंगड्डा, जिल्हाधिकारी सालीमठ, पी शिवा शंकर, तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी मंदिरप्रमुख रमेश चौधरी आदी सहभागी झाले होते.
आज बुधवार दि. २५ ऑक्टोबर रोजी उत्सवाच्या तृतिय दिवशी पहाटे ५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ७ वाजता श्रींची पाद्यपुजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ४ ते ६ या वेळेत प्रभंजन भगत यांचे कीर्तन कार्यक्रम श्रींचे समाधी मंदिराच्या उत्तर बाजुचे स्टेजवर होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता श्रींची धुपारती होईल. रात्री ७.३० ते ९.४५ यावेळेत शाहिर श्री उत् तम रामचंद्र गायकर, वाघेरे, जि. नाशिक यांचा साई भजन संध्या कार्यक्रम हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर होईल. रात्री १० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.
बेंगलोरच्या साईभक्तांकडून स्वयंचलित आटा मशिनची देणगी
बेंगलोर येथील साईभक्तांनी श्रीसाई प्रसादालयाकरीता ३० लाख ५० हजार किंमतीचे एक अत्याधुनिक स्वयंचलित आटा युनिट देणगी स्वरुपात दिले आहे. या युनिटमध्ये गहु साफ सफाई, निवडणे, दळणे ही कामे स्वयंचलित होणार आहेत. या आटा युनिटद्वारे प्रतितास १००० किलो आटा उपलब्ध होणार आहे.