अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १ जुलै रोजी कृषी सप्ताहाचा शुभारंभ मा.आमदार निलेशजी लंके साहेब नगर पारनेर विधानसभा,पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना,मा.गहिनीनाथ कापसे उपविभागीय कृषी अधिकारी,मा.अनिल गवळी प्रकल्प संचालक आत्मा,
मा.अरविंद पारगावकर-जनरल मॅनेजर एल अॅन्ड टी कंपनी, मा.श्रीकांत गाडे एल अॅन्ड टी कंपनी एच.आर.प्रमुख,मा.नालकर साहेब प्रमुख शास्त्रज्ञ के.व्ही.के.बाभळेश्वर,
मा.रामदास तुंबारे मंडळ कृषी अधिकारी ,मा.शेखर देशमुख एल.अॅन्ड टी कंपनी उत्पादन विभाग प्रमुख,मा.ईश्वर हांडे एल अॅन्ड टी कंपनी व्यवस्थापक,मा.बाळासाहेब काकडे कृषी सहाय्यक तसेच कृषी विभागातील इतर अधिकारी व हिवरे बाजार येथील शेतकरी यांच्या उपस्थितीत पार पडला.कार्यक्रम सुरवातीस शेतकरी व वारकरी यांची एकत्रित दिंडी प्रदिक्षणा गावात काढण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.श्री.नालकर साहेब प्रमुख शास्त्रज्ञ के.व्ही.के.बाभळेश्वर यांनी बोलताना सांगितले सीताफळ लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सीताफळावर प्रक्रिया करून बाजारपेठेत कसे टिकवता येईल याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे.
तसेच कीड रोगाचे नियंत्रण वेळीच केले पाहिजे.श्री.कापसे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी यांनी बोलताना सांगितले राज्यातील शेतकऱ्याचे उत्पादन वाढावे व तो समृद्ध व्हावा यासाठी १ जुलै ते ७ जुलै कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येतो.यानुसार पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे.
हिवरे बाजार येथे चालू वर्षी १५ हेक्टरवर विकसित सीताफळ वाणाची लागवड करण्यात आली असून या शेतकऱ्यांना फळबागापासून अधिक उत्पादन अधिक लाभ मिळवून देण्याचे काम कृषी विभागामार्फत जमिनीचा पोत कमी होऊ न देता उत्पादन वाढीवर परिणाम न होता जमीन पण सशक्त व उत्पादन भरपूर असा मेळ हिवरे बाजार येथे आजच्या कार्यक्रमानिमित राबविणार आहे.
सीताफळ लागवडीचे नियोजन करून येणारे उत्पादन हे हिवरे बाजार येथे या मालावर सीताफळाच्या गरापासून उत्पादने तयार करून शेतकऱ्यांच्या सीताफळाना चांगला भाव मिळणार आहे.कार्यक्रमात निलेश लंके प्रतिष्ठान तर्फे शेतकऱ्यांना रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews