अहमदनगर बातम्या

लव जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज – खा. सुजय विखे

Ahmednagar News : हिंदू माता भगिनीं वरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज असून अशा ‘जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

राहुरी येथे सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, संसदेचे सध्या अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अविश्‍वासाच्या ठराव प्रसंगी बोलताना लव जिहादच्या कायद्याविषयी आपण निवेदन करणार असून, अलीकडच्या काळात अशा घटना दुर्दैवाने वाढत आहेत.

कोणतेही सरकार अशा घटना घडाव्यात, यासाठी काम करत नसते मात्र सरकार अशा समस्या समूळ नष्ट करण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून त्यावर उपाय काढते. नगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या दोन, तीन घटना घडल्या असून पोलीस प्रशासनास वेळोवेळी कडक शब्दात सूचना आपण केल्या

असल्याचे सांगताना खा.विखे म्हणाले की, जिल्ह्यातील माता, भगिनींच्या पाठीशी हा भाऊ सदैव असून त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही आणि हाच विश्‍वास देण्यासाठी या मोर्चात आपण सहभागी झालो आहोत, असे सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts