अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यातील चार ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले.
याप्रकरणी चौघांविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून या कारवाईत हातभट्टी दारू व रसायन असा 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुहास नंदकुमार आलवट व बरकतअली रशीद शेख (दोघे रा. मांडवगण ता. श्रीगोंदा) यांच्याविरूध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सोमनाथ ऊर्फ उमर्या शाम पवार व श्रीकांत प्रभाकर काळे (दोघे रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर) यांच्याविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे,
विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, शंकर चौधरी, सचिन आडबल, संभाजी कोतकर यांच्या पथकाने मंगळवार व बुधवार ही कारवाई केली.